पुणे / वार्ताहर :
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचायझी देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामाजयम गोविंद राज कुट्टी (वय 62, रा. पौड रस्ता, पुणे), स्वप्नील रामाजयम आय्या कुट्टी, अनुप्रियता रामाजयम आय्या कुट्टी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संजय शामराव येवले (55, कात्रज, पुणे) यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय येवले यांनी रामाजयम कुट्टी यांना पुण्यातील सांबर हॉटेलची फ्रेंचायझी देण्यासाठी 15 लाख रुपये, हॉटेलसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 10 लाख रुपये आणि कामगारांच्या पगारासाठी 5 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपये दिले. मात्र, येवले यांना हॉटेलची फ्रेंचायझी देण्यात आली नाही. तसेच पैसे मागितल्यानंतर खाते बंद झालेल्या बँक खात्याचे 10 लाखांचे 3 चेक देऊन फसवणूक केली.








