दुकानवाड /वार्ताहर
गेले चार पाच दिवस कोसळणाऱ्या पावसाचा तडाखा उपवडे शाळेला बसला असुन एका वर्गखोलीचे छप्पर कोसळले. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी गावकरी व ग्रामपंचायत स्तरावरून गेले वर्षभर प्रयत्न करीत आहेत.जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, केद्र प्रमुख, यांनी या शाळेला भेट देऊन शाळेची पहाणी केली , शाळेच्या ईमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले परंतु गेले वर्षभर फक्त फायली या टेबलावरून त्या टेबलावर या पलीकडे काहीही झाले नाही. काम मंजूर झाले पण अद्याप कोणत्याही ठेकेदाराला दिले नाही वेळीच मंजूरीची प्रक्रिया झाली असती तर आज छप्पर कोसळण्याची वेळ आली नसती सरकारी काम अन् सहा महिने थांब हे लोकांनी ऐकले होते पण आता वर्षभर थांब म्हणण्याची वेळ ग्रामस्थांना आली आहे प्रशासनाच्या या ढिसाळ पणाचा ग्रामंस्थानी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यानी माहीती देताच सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवास कारूडकर, पोलीस पाटील जिजानंद शेडगे, संतोष राऊळ, रामू शेडगे यांनी शाळेला भेट दिली व पहाणी केली. पंचनामा गोठोस तलाठी श्री राणे यांनी केला.









