कसबा बीड,प्रतिनिधी
Kolhapur News : पाडळी खुर्द तालुका करवीर येथे स्वर्गीय एस. आर. पाटील यांची 21 वी पुण्यतिथी विविध कार्यक्रम घेऊन संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय एस. आर. पाटील यांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणावरच जनसेवा समूहाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.
पाडळी खुर्द येथील सहकार समूहाचे संस्थापक सहकारातील मार्गदर्शक,शैक्षणिक, राजकीय,समाजकारणातील ज्येष्ठ अभ्यासक स्वर्गीय एस. आर. पाटील यांची 21 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. जनसेवा समूह पाडळी खुर्द यांचे वतीने पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात कै.एस. आर. पाटील यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील,कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके,रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील,व्हा.चेअरमन शिवाजीराव देसाई,मॅनेजर तानाजी निगडे यांच्या उपस्थितीत व कै. एस आर पाटील ट्रस्टचे ट्रस्टी यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.जनसेवा सहकार समूह यांचे मार्फत पाडळी खुर्द गावातील इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके व प्रमुख पाहुणे विश्वासराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सहकारामध्ये सर्वांना मार्गदर्शक असणारे कै. एस. आर. पाटील यांनी समाजकारण व राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटवला होता.त्यांच्या या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय या युवा पिढीसाठी प्रोत्साहन देणारा आहे. पाडळी खुर्द गावातील कुस्ती , विविध खेळात व शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडले आहेत. यापुढेही अशाच विविध पद्धतीचे उपक्रम राबवून गावातील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा हीच माझी सदिच्छा असे आपल्या मनोगत सांगितले.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील,कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके, रयत संघाचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील,व्हा.चेअरमन शिवाजी देसाई,मॅनेजर तानाजी निगडे,कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक आनंदराव पाटील,विद्यमान संचालक सरदार पाटील, पाडळी खुर्द गावचे सरपंच तानाजी पालकर,दादासो पाटील , सत्कार मूर्ती विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ पाटील प्रस्तावना जनसेवा समूहाचे प्रमुख आनंदा नामदेव पाटील व आभार इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.









