अटींसह उ•ाणाची परवानगी दिल्याने दिलासा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘गो फर्स्ट’ची विमाने पुन्हा एकदा उडताना दिसणार आहेत. ‘डीजीसीए’ने या विमान वाहतूक कंपनीला अटींसह उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. डीजीसीएने ‘गो फर्स्ट’चे रिझोल्यूशन व्यावसायिक शैलेंद्र अजमेरा यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. ‘गो फर्स्ट’ने 26 जून रोजी ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सादर केलेली योजना तपासल्यानंतर नियामकाने त्याचा स्वीकार केला आहे. त्यानुसार आता ‘गो फर्स्ट’ अटींसह पुन्हा विमानसेवा सुरू करू शकते.
अंतरिम निधीची उपलब्धता आणि ‘डीजीसीए’कडून उड्डाण वेळापत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर ‘गो फर्स्ट’ नियोजित उड्डाणे सुरू करणार आहे. यासोबतच डीजीसीएची परवानगी मिळाल्यानंतरच तिकिटांची विक्री सुरू केली जाईल. कोणत्याही एअरलाईन्ससाठी नेहमीच एअर ऑपरेटर प्रमाणपत्र असणे खूप महत्वाचे असते. तसेच, सेवेमध्ये वापरलेले विमान उडण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असावे लागते.









