अभिनेता वत्सल सेठ झाला पिता
बॉलिवूडचे लोकप्रिय दांपत्य इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. इशिता शुक्रवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचे समजते. इशिताने पुत्राला जन्म दिल्यावर दत्ता तसेच सेठ कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. इशिताने स्वत:या पुत्रासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
इशिता दत्ता आणि वत्सल सेठने 28 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईत विवाह केला होता. दोघांची पहिली भेट टीव्ही शो ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे डेटिंग केल्यावर दोघांनीही विवाह केला होता.
इशिता तसेच वत्सल हे दोघेही अनेक चित्रपटांमध्ये दिसून आले आहेत. वत्सल सध्या टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. तर इशिता अलिकडेच दृश्यम 2 या चित्रपटात दिसून आली आहे. दृश्यम चित्रपटामधील इशिताच्या अभिनयाचे समीक्षकांनी मोठे कौतुक केले होते. पुत्राला जन्म दिल्याने इशिता पुढील काही काळ कुठलाच प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचे मानले जात आहे. पुत्राला जन्म दिल्यावर इशिताला अनेक सहकलाकारांकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.









