सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांचे निवेदन
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली पागावाडी येथील धबधब्यावर वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो म्हणून या ठिकाणी स्थानिकांचा सुरक्षिततेसाठी अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी केली आहे. त्या बाबतचे लेखी निवेदन त्यांनी बांदा सहा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांना दिले आहे. यावेळी इन्सुली माजी सरपंच नाना पेडणेकर, बापू कोठावळे उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले की, येथील पागावाडी धबधब्यावर जिल्ह्यातील व परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परिसरात धिंगाणा घालत असता त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतात अनेक स्थानिक ग्रामस्थांनी आपल्याकडे तश्या तक्रारी दिल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. अशी मागणी राणे यांनी केली आहे.









