प्रतिनिधी/बेळगाव: बेळगाव सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून ४ लाख रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव सीसीबी पोलिसांनी शहरातील सदाशिवनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये धाड टाकली असता अवैधपणे विविध कंपनीच्या स्टिकर्स चिकटावून नकली दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकणाराशी संबंधी उज्ज्वलनगरचे रहिवासी २२ वर्षीय हसन जावेद बेपारी आणि विजयनगर हिंडलगाचे रहिवाशी राजेश केशव नायक यांना अटक केली असून त्यांच्या कडून 750 एमएलचे 439 बाटल्या, 375एमएलचे 20 बाटल्या, 180 एमएलचे ०२ टेट्रा पॅक, एक इंडिका कार, २१,५००/- रुपये किंमतीचे ४ मोबाईल फोन्स आणि १७,५००/- रुपये रोख असे एकूण ४ लाख रुपये किंमतीचे ऐवज जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस एन सिद्रामप्पा यांनी दिली.
याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीबी पीआय अल्ताफ मुल्ला, सीएचसी हणमंत निसून्नवर, संतोष पाटील, सीपीसी काडाय्या चरलिंगमठ, श्रीधर भजंत्री, यासिन नदाफ, सुभाष सिंघे, रमेश अक्की यांनी परिश्रम घेतले. याबाबत बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी अधिकाऱ्यांची प्रशंसा करत विशेष बक्षीस जाहीर केले आहे.









