वास्को : दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतूक मोपा विमानतळावर वळवण्यात येत असून हा दाबोळी विमानतळावर अन्याय आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाबोळी विमानतळासमोर निदर्शने केली. केंद्र व राज्य सरकारकडून हवाई वाहतूक मोपाकडे वळवण्यासाठी हवाई वाहतूक कंपन्यावर दबाव आणीत असले तरी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद पडू देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतूक हळुहळू कमी होऊ लागलेली आहे. हे चालूच राहिल्यास पुढील काळात दाबोळी विमानतळ बंद होणार आहे. हा विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठी हवाई कंपन्यांवर स्थलांतर करण्यासाठी दबाव येत आहे. सत्य परिस्थिती आता समोर येऊ लागली आहे. हा प्रकार निषेधार्ह असून आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत, असे काँग्रेस नेते एल्वीस गोम्स म्हणाले. सरकारने गोवा विकायला काढल्याचा आरोप यावेळी निदर्शकानी केला. लोकांनी जागृत होऊन सरकारच्या प्रयत्नांचा निषेध करायला हवा. केवळ खासगी कंपन्यांना पाठीशी घालण्यासाठी दाबोळी विमानतळाचा बळी देण्याचा प्रयत्न होत आहे. याचा फटका दक्षिण गोव्यातील उद्योग व्यवसायाला बसणार आहे. त्यामुळे नव्या विमानतळावर नवीन हवाई वाहतूक सुरू करा. मोपासाठी दाबोळी बंद करू नका असे आवाहन निदर्शकांनी केले.
Previous Articleतेरा वर्षांत शेकडो अधिकाऱ्यांना सेवावाढ
Next Article दाबामळ – सांगे येथे महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.