अग्निशामक दलाच्या वाहनाची नुकसानी
वाळपई : मुसळधार पावसाचा फटका सत्तरी तालुक्याला बसलेला आहे. बुधवारी सकाळी वाळपई मामलेदार कार्यालयाच्या इमारत सभोवताची संरक्षक भिंत अग्निशामक दलाच्या वाहनावर कोसळल्याने काही प्रमाणात नुकसानी झाली. सुदैवाने सदर प्रकार सकाळी 7 वाजता घडल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच् अनुचित घटना घडली नाही. सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी मामलेदार कार्यालयाच्या सभोवताची संरक्षक भिंतीच्या काही भाग अग्निशामक दलाच्या वाहनावर पडला. घटनेची माहिती मिळताच वाळपई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेले दगड, माती हटविली. सदर ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत उभारण्यावर लक्ष देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









