ग्रामीण भागातील चित्र : सायंकाळी 5 वाजताच रुग्णालये बंद झाल्याने समस्या : ऊग्णांना-नातेवाईकांना होतोय त्रास : 24 तास सेवा देण्याची मागणी
बेळगाव : आरोग्य सेवा ही जनसेवा मानली जाते. त्यामुळेच डॉक्टरांना रुग्ण देव मानतात. मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा ही रामभरोसेच आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्याची गरज आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास डॉक्टरांची सेवा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. विविध आजारांनी नागरिक त्रस्त असताना ग्रामीण भागातील सेवा 24 तास सुरू ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुणियासारखे साथीचे आजार फैलावत आहेत. हे आजार फैलावू नयेत यासाठी आतापासूनच काळजी घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध कऊन देण्याची मागणी होत आहे. शहरी भागात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष होत असून जागृतीबरोबरच नागरिकांना योग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
ऊग्ण-नातेवाईकांना नाहक त्रास
अनेक ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे येथील ऊग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किमान पावसाळा संपेपर्यंत तरी योग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यंतरी कोरोना काळात डॉक्टरांनी उत्तम सेवा बजावली होती. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांना बरे केले आहे. मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र इतर आजारांनी डोके वर काढले आहे. तेव्हा याचा विचार गांभीर्याने करून 24 तास डॉक्टरांची सेवा पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
मान्सूनला सुऊवात झाल्यानंतर साथीचे आजार उद्भवू लागतात. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. सर्वत्र अस्वच्छता पसरली तर दुर्गंधीबरोबरच आजारही उद्भवण्याची शक्मयता असते. तेव्हा डबके किंवा इतर ठिकाणी साचलेले पाणी काढण्याची सूचना ग्राम पंचायतींना करण्याकडे आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी ग्रामीण भागात जनजागृतीची गरज असते. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रक्त तपासणीच्या नावाखाली ऊग्णांना लुटण्याचा प्रकार
औषधाची फवारणी व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दिवसभर उपस्थित राहणे गरजेचे आहे. खासगी ऊग्णालयामध्ये रक्त तपासणीसाठी ऊग्णांकडून अधिक रक्कम उकळली जात आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रकार सुरू आहे. तो थांबविण्यासाठी आरोग्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विविध रोगांबाबत अजूनही काहींना याची माहिती नाही. जनजागृती करून साथींच्या आजाराबाबत माहिती देण्याची गरज निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यू किंवा मलेरियासारख्ये संशयित ऊग्ण आढळल्यास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला तातडीने पाठवावे. कारण ग्रामीण भागात सर्व सुविधा उपलब्ध करणे अशक्मय नाही. मात्र रात्रीच्यावेळी ही प्राथमिक आरोग्य केंद्रे बंदच असल्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात येते. तोपर्यंत रोग बळावू शकतो. तेव्हा याबाबत तालुका आरोग्याधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात जर 24 तास डॉक्टरांची सेवा सुरू झाल्यास ऊग्णांची सोय होवू शकणार आहे, असे मत अनेकांतून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यावर भर
सध्या ग्रामीण भागात योग्य प्रकारे आरोग्य सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, चिप़ुनगुनिया आदी आजारांवर निर्बंध कशा प्रकारे घालता येईल तसेच डॉक्टर अधिक वेळ थांबून रुग्णांना सेवा पुरवतील, यावर विशेष उपाय आखण्यात आले आहेत. लवकरच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
– तालुका आरोग्याधिकारी. डॉ. शिवानंद मास्तीहोळी









