(भाग चार)
आकाशाखाली पडल्यानंतर रात्रीच्या वेळेला जे ब्रह्मांडाचे वैभव आपल्याला डोळ्याने दिसायला लागतं ते म्हणजे आकाश. आपल्याकडे प्रत्येकाचं आकाश ठरलेलं असतं. कुणाचं मोठं असतं, कुणाचं उंच असतं, कुणाचं अंधुक असतं, तर कुणाचं सोनेरी असतं. प्रत्येकाचं आकाश म्हणजेच आकाशातली आपली जागा. असं आकाश कालिदासाच्या ऋतू संहारातसुद्धा सुंदर वर्णन केलेले होते. म्हणजे नेमकं काय होतं हेही आपल्याला या आकाशाकडे पाहिल्यावरच दिसतं. आकाशाची खिडकी किंवा खिडकीतलं आकाश या दोन्ही कल्पना आपल्या मनाच्याच. आपल्याला आकाशात नेमकं काय दिसतं हे जास्त त्यांना ठरवायचं असतं. अशा आकाशावरती आपल्या प्रतिभेचा किंवा भक्तीचा वेलू नेणारे ज्ञानदेव आपल्याला खूप मोठे वाटतात किंवा आकाशापर्यंतचे अणूरेणू आपल्यामध्ये सामावलेले आहेत याची जाणीव होणं यालाच आम्ही तुका आकाशाएवढा होणं असं म्हणतो. खरंतर आकाशाचा गुणधर्म म्हणजे विराट अखंड मारणार किंवा तारणार, स्फूर्ती देणार, भयचकीत करणार, अलोट अनपेक्षित असं काही घडवणार. विश्व शक्तीचं दर्शन म्हणजे आकाश. साधुदास नावाच्या कवीने एक फार सुंदर कविता लिहून ठेवली आहे.
गगनाच्या अंगणी उमटते पाऊल शुभ लक्षणे नाजूक गोंडस असे कुणाचे सांग
मला ग कुणी पाऊल पडता क्षणी जाहली तुटा तुटी पैंजणी काही असता व्यस्त
विखुरले नक्षत्रांचे मणी उरले काही गुणी तयांचा रुणझुण उठतो ध्वनी कानी येतो
अव्यक्ताच्या तो
अवकाशातून असा ध्वनी किंवा स्वर अवकाशातून ऐकू येणं यालाच शास्त्रज्ञांनी कॉस्मिक पॉवर असेही म्हटले आहे. बाबा बोरकर तर याला म्हणतात जनकुळावले सकळ उलट चालले, याचा अर्थ असा आहे की आम्हाला जे दिसतं तसं नसतं आणि आम्ही जे शिकतो ते प्रत्यक्षात तर मुळीच दिसत नाही. कारण ते आम्हाला कसं बघायचं हे शिकवलं जात नाही. दुसऱ्यांनी आपल्याशी कसे वागावे हे शिकवलं जातं पण आपण दुसऱ्याशी कसं वागलं पाहिजे, हे मात्र आम्ही शिकायचं जसं विसरून जातो. तेच हे तत्व आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे असं समजून आम्ही वागायला लागलो की मग मात्र आमच्या वागण्यामध्ये आम्हाला खूप फरक जाणवतो. असा फरक पाहायचा असेल तर आकाशाकडे बघून हात पसरून मोठ्याने भगवंताला हाक मारा तिथून जो नाद उमटतो. त्या नादाला दोन शब्द आहेत. एकाला आहात नाद म्हणतात तर दुसऱ्याला अनाहत म्हणतात. आहात नाद जो असतो तो आम्ही बरेचदा दोन गोष्टी एकमेकांवर आपटून करतो. परंतु अनाहत नाद जो आहे तो मात्र या अवकाशाच्या पोकळीतून उमटतो आणि म्हणूनच अशी सर्जकता असा नाद ऐकू यायला आम्हाला त्याच्याशी एकरूप व्हायला हवं.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगं.
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिरर्ध्यानगम्यम
वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथम
अशा त्या मेघवर्ण विष्णूला म्हणजेच आकाश तत्वाला प्रणाम असो.








