दापोली प्रतिनिधी
विसापूर, विश्रांतीनगर, मधलीवाडी, ता. दापोली येथे घरात एकटी राहणारी वृध्द महिला दीपावती सीताराम घाग, ८७ हिच्या छातीवर कोणीतरी अज्ञात आरोपीने जोरदार प्रहार करुन तिचा खून केला तसेच तिच्या गळयातील ७८,०००/- रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ जबरीने चोरुन नेली म्हणून दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ११९ / २०२३ भादविक ३०२४५२.३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती दापोली पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करुन आजुबाजुचे लोकांकडे चौकशी केली. त्यातून मयत महिलेस चोरीच्या उद्देशाने स्थानिकानेच ठार मारले असल्याचा संशय आल्याने आजुबाजुला राहणारे तसेच तिचे नातेवाईक व स्थानिक गावकरी यांचेकडे सातत्याने कसुन चौकशी केल्यानंतर आरोपी महिला सृष्टी संतोष कदम, ( ३७ रा. विसापुर मधीलवाडी ता. दापोली) हिच्यावर दाट संशय आल्याने तिचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता ती प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवू लागली त्यानंतर तिला आणखी विश्वासात घेवून चौकशी केली असता तिनेच गुन्हा केल्याची खातरजमा झाली, अशा प्रकारे अवघ्या १२ तासात मयत हिस आरोपी हिने जीवे ठार मारुन गळयातील सोन्याची बोरमाळ चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, दापोली पोलीस ठाणे हे करीत आहेत. गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड . राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक अहिरे, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, महेश पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक, मिलिंद चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, रुपाली ढोले, पोलीस नाईक विधी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुरज मोरे, पंकज पवार, सुहास पाटील, चालक नीलेश जाधव, शुभम रजपूत यांनी केली.









