ऑनलाईन टीम / मुंबई :
बेंगळूर येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या आघाडीचे नाव यूपीए नव्हे तर ‘इंडिया’ असणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी तयार करण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले होते. या बैठकीत आघाडीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ‘इंडिया’ असं या आघाडीला नाव देण्यात आलं आहे. इंडिया म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स.
नव्या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आघाडीकडून या नावासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.









