निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळे विधीमंडळात कोणताही पेच निर्माण झाला नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले नाही त्यामुळे त्यांना पदावरून हटवता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. काल ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विधानसभा अध्यक्षा निलम गोऱ्हे यांच्यासह मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री सभागृहात बोलत होते.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विशेषता ठाकरे गटाने मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. या संदर्भातील विरोधकांनी विधीमंडळ सचिवांना पत्र लिहून हि कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कोणताही घटनात्मक पेच निर्माण झाला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केलेले नाही. त्यामुळे विधीमंडळात कोणताच घटनात्मक पेच निर्माण झालेला नाही. त्यामुळे निलम गोऱ्हे यांना सुनावणी पुर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्षपदावर राहण्याचा अधिकार आहे.” असे म्हटले आहे.








