गोवा पोलिसांनी 36 ठिकाणाहून जप्त केलेल्या रू. 1.10 कोटीच्या अमलीपदार्थाची विल्हेवाट
फोंडा : अमलीपदार्थ विक्रीविरोधात गोवा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या वेळी आरोपीना अटक केल्यानंतर मुद्देमाल जप्त करण्यात येतो. याच अमलीपदार्थाची रितसर विल्हेवाट कुंडई फोंडा येथील बायोटिक वेस्ट सोल्dयुशन येथे लावण्यात आली. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या देखरेखेखाली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्हीडीओ कॉन्फरेन्सिगद्वारे मार्गदर्शनाखाली काल सोमवारी सकाळी करण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कुंडई येथील बायोटीक वेस्ट ट्रिटमेंट प्लॉट येथे ‘अमलीपदार्थ विल्हेवाट करण्याच्या दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातील विविध 36 ठिकाणी छापा मार कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सुमारे 25 किलो वजनाचा अमलीपदार्थाचा समावेश होता. ज्याची किंमत सुमारे 1 कोटी 10 लाख रूपये आहे. तज्ञाच्या देखरेखेखाली अमलीपदार्थाची विल्हेवाट कुंडई येथील अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पात लावण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलीस अधिक्षक निधीन वालसन, अभिषेक धानिया, पोलीस निरीक्षक मोहन गावडे व अमली पदार्थ विरोधी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोवा पोलीस आणि अमलीपदार्थ विरोधी पोलीस स्थानक यांनी हे विविध 36 ठिकाणाहून जप्त केले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की तरूणांनी अमली पदार्थ सेवन करू नये. गोव्याच्या चांगल्या भविष्यासाठी युवकांनी अमलीपदार्थ सेवनाला नकार द्यावा. या विषयावर शालेय व महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्यासाठी आपण या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावल्याचे त्यानी यावळी नमूद केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अमली पदार्थ विरोधी पथक समितीतर्फ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ड्रग्सविरोधी लढ्यात गोवा पोलीस उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पोलिसांचे कौतुक केले.









