वृत्तसंस्था/ सेसकेतून (कॅनडा)
रविवारी येथे झालेल्या आयटीओ महिलांच्या सेसकेतून चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेनिसपटू करमन कौर थांडीने कॅनडाची साथीदार स्टेसी फंग समवेत महिला दुहेरीचे उपविजेतेपद मिळविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या रेनचेल आणि अॅलेना स्मिथ यांनी थांडी व फंग यांचा 4-6, 6-4, 10-7 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.









