वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 मध्ये मे महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे खर्च करण्याच्या प्रमाणात चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. या मार्फत करण्यात आलेल्या खर्चाची रक्कम मेमध्ये 1 लाख 40 हजार कोटी इतकी नोंदली गेली आहे. वापर करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डची संख्या 8.74 कोटी इतकी झाली होती. यातही मेमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक 1.81 कोटी क्रेडिट कार्ड वापरले गेले होते. याचाच अर्थ यांचा वापर एकंदर वापरात पाहता 28 टक्के इतका अधिक राहिला होता. नव्या कार्डचा वापर आर्थिक वर्षात पहिल्या दोन महिन्यात 20 लाखावर पोहचला आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार पाहता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2022-23 आार्थिक वर्षात 1.1 ते 1.2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
क्रेडिट कार्ड वापरात मे मध्ये
कोणती बँक अग्रेसर
एचडीएफएसी 1.81 कोटी
एसबीआय 1.71 कोटी
आयसीआयसीआय 1.46 कोटी
अॅक्सिस बँक 1.24 कोटी
सक्रिय व्रेडिट कार्डची
संख्या महिन्यानुसार
जानेवारी 8 कोटी 24 लाख
फेब्रुवारी 8 कोटी 33 लाख
मार्च 8 कोटी 53 लाख
एप्रिल 8 कोटी 65 लाख









