जत, प्रतिनिधी
farmers Agitation in Jat : एकीकडे आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच,सांगलीच्या जतेत दुष्काळ प्रश्नी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, रिपाई व इतर पक्ष,सामाजिक संघटना रस्त्यावर उतरली आहे.जत तालुका दुष्काळी जाहीर करावा,विस्थारीत म्हैसाळ योजनचे संपूर्ण टेंडर प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरु करावे,जनावरांसाठी चारा छावणी किंवा डेपो सुरु करावेत,म्हैसाळ आवर्तन सुरु करण्यात यावे, जत शहराचा अमृत योजनेत समावेश करावा या मागण्यासाठी भाजप व इतर सर्व पक्षीय यांच्या वतीने सोमवारी जतेत विजापूर गुहागर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार विलासराव जगताप व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केले.या आंदोलनात तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.तर शहरातील व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिला विशेष म्हणजे मोठया संख्येने तरुण व शेतकरी सहभागी झाले होते.
सकाळी साडे अकरा वाजता बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनास सुरुवात झाली.त्यानंतर आंदोलनकर्ते येथील महाराणा प्रताप चौकात येत त्यांनी ठिय्या मारत विजापूर गुहागर मार्ग रोखून धरला. यामुळे विजापूर,सांगोला,सातारा,आथनी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. दुपारपर्यंत वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.डोक्यावर दुष्काळ जाहीर करा अशा पांढऱ्या टोप्या,टी शर्टवर मागण्याचे लक्ष वेधणारे फलक आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. जोवर सरकार सवलती देण्यासंदर्भात ठोस निर्णय घेणार नाही, तोवर आंदोलन मागे नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे.
यावेळी प्रमोद सावंत,आकाराम मासाळ,भैय्या कुलकर्णी, रवींद्र सावंत, रामन्ना जीवनणावर, बसगोंडा जबगोंड, बसवराज डोडमाल, लक्ष्मण बोराडे, प्रभाकर जमदाडे, संजय कांबळे, विकास साबळे, दिग्विजय चव्हाण, आण्णा भिसे, सद्दाम अत्तार, बसवराज चव्हाण, पिंटू माने, योगेश होनमाने, नीलखंठ संत्ती, संतोष मोटे, अजिक्य सावंत, प्रकाश मोटे, तम्मा सगरे, अविनाश वाघमारे, मकसूद नगारजी, किरण साळुंखे, पिंटू तंगडी, गौतम ऐवळे, शंकर वगरे, आनंदराव पाटील, विठ्ठल निकम, चिदानंद चौगुले, लक्ष्मण सिदरेड्डी, बापू पाटील, प्रकाश माने, मिथुन भिसे, अभिजित चव्हाण, तेजस्वानी होनमाने, अविनाश गडीकर, संतोष कोळी, राजू चौगुले, अमीर शेख, हेमंत चौगुले, संजय गावडे, बाळू निंगनूर, दयानंद फडतरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.