वार्ताहर /नंदगड
नंदगड येथील माती व कलाकार उत्कृष्ट असल्याने त्यांच्या कलेला आजही तितकाच प्रतिसाद मिळत आहे. येथे बनविण्यात येणारी मातीची भांडी विविध कलाकुसरीने परराज्यातही लोकप्रिय आहेत. शिवाय येथील कलाकारांकडून बनविण्यात येणाऱ्या मातीच्या गणेशमूर्तींना सर्वत्र मागणी आहे. एका नंदगड गावातील पाच कलाकारांनी लहान मोठ्या अशा तब्बल चार हजार गणेश मूर्त्या बनविल्या आहेत. शनिवारपासून गणेश मूर्त्यांना आता रंग देण्याचे काम सुरू झाले आहे. नंदगड कुंभार गल्लीतील ईश्वर गडकरी, महादेव गडकरी, कपिल गडकरी, दत्ताराम कुंभार, शिवाजी कुंभार या कुटुंबातील लोक गणेश मूर्त्या बनवितात. नंदगड परिसरातील 50 हून अधिक गावातील लोक नंदगड येथील गणेश मूर्त्या नेतात. शिवाय अलीकडेच नवीन घरांतून बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीही येथूनच नेण्यात येतात. शिवाय तालुक्याच्या बाहेरगावीही या मूर्त्याना मोठी मागणी आहे.









