बेळगाव : टेक्सास इन्स्ट्रूमेंट आणि युथ फॉर सेवा बेळगाव यांच्यावतीने चिकोडी, खजगोनट्टी येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 240 विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, कंपास पेटी, पुस्तके, पेन्सिल, खोडरबर आदी साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून युथ फॉर सेवाने हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच इतर सेवाभावी संस्थांनीही मुलांच्या शिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून युथ ऑफ सेवा बेळगाव जिल्हा संयोजक संतोष खोतरू यांनी सरकारी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी स्वयंसेवक यल्लाप्पा, भारती, ऋतिका, कलाश्री, पूजा, ऐश्वर्या यासह एसडीएमसी सदस्य, पालक, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.
Previous Articleअल्कारेझ बनला नवा ‘विम्बल्डन सम्राट’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.