व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी दोषी
► वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तिघांना जवळपास 45 वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बलजीत बागरल, डेव्हिड बागरल आणि सानू अशी संबंधितांची नावे असून शिक्षा झालेल्यांपैकी दोघे भाऊ आहेत. एका व्यक्तीचे अपहरण करून कारमध्ये हल्ला केल्याप्रकरणी ते गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये दोषी आढळले होते. या तिघांवर इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्स भागातील वोल्व्हरहॅम्प्टन शहराच्या मध्यभागी एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
तपासाअंती उघड झालेल्या माहितीनुसार, बागरल बंधूंसह सानू याने व्यावसायिकाला एका व्हॅनमध्ये बसवून त्याचे हात बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधून दुकानात नेले. तेथे त्यांनी त्याला मारहाण केल्यानंतर डोक्मयात बंदूक ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या महिन्यात वोल्व्हरहॅम्प्टन क्राउन न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिघांनीही आरोपांची कबुली दिली होती. मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याच्या एकमेव उद्देशाने आपण हा गुन्हा केल्याचे त्यांनी मान्य केले होते.