पुरातत्व तज्ञांना मिळाला 3 हजार वर्षे जुना कॉरिडॉर
पेरूमध्ये काम करणाऱ्या पुरातत्व तज्ञांनी 3 हजार वर्षे जुन्या एका कॉरिडॉरचा शोध लावला आहे. याला कॉन्डर्स पॅसेजवे म्हटले जात आहे, जो बहुधा प्राचीन चाविन संस्कृतीशी संबंधित एका विशाल मंदिर परिसराच्या उर्वरित खोल्यांकडे जात असावा. हे ठिकाण पेरूची राजधानी लीमापासून 306 किलोमीटर अंतरावर आहे. चाविन डी हुआनतार हे पुरातत्व स्थळ या संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण केंद्रांपैकी एक आहे. हे स्थळ सुमारे 1500 ते 500 ख्रिस्तपूर्व काळात विकसित झाले आहे.

चाविन हे स्वत:च्या प्रगत कलेसाठी प्रसिद्ध आहे, यात सर्वसाधारपणे पक्ष्यांचे चित्रे काढण्यात आलेली आहे. पेरूवियन एंडीजच्या उत्तर हायलँड्समध्ये पूर्वीच्या कृषक समुदायांपैकी हे एक आहेत. इंका साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी त्यांचे येथे वास्तव्य होते. चाविनमध्ये शोध लागलेल्या मंदिराच्या दक्षिण हिस्स्यात हा कॉरिडॉर आहे. संरचनात्मक कमकुवतपणामुळे हा कॉरिडॉर बंद करण्यात आला होता असे पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे.
या कॉरिडॉरमध्ये सुमारे 17 किलोग्रॅमचा एक मोठा सिरॅमिकचा तुकडा मिळाला असून त्यावर कोंडोर पक्ष्याचे आणि पंख रेखाटण्यात आले आहे. कोंडोर जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांपैकी एक आहे. या पक्ष्याला प्राचीन एंडियन संस्कृतींमये शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात होते अशी माहिती स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पुरातत्वतज्ञ जॉन रिक यांनी दिली आहे.
रोबोट कॅमेऱ्यांद्वारे लागला शोध
मंदिर परिसरात छतांसोबत कॉरिडॉरचे नेटवर्क देखील आहे. याचा अलिकडेच शोध लागला आहे. मंदिर परिसरातील बहुतांश हिस्स्यात अद्याप उत्खनन झालेले नाही. कॉन्डर्स पॅसेजवेचा शोध रिक यांच्या टीमने लावला आहे. रोबोट कॅमेऱ्यांचा वापर करत याची पाहणी करण्यात आली आहे.









