ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीत मंत्र्यांना शरद पवारांचा आशिर्वाद मिळणार की आणखी काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.
उद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वी अजित पवारांसह त्यांचे आठ मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल हे मंत्री वाय. बी. सेंटरवर दाखल आहेत.
दरम्यान, पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील तातडीने वाय. बी. सेंटरवर दाखल होण्यास सांगितले आहे. त्यानुसार जयंत पाटील विरोधकांची बैठक सोडून वाय. बी. सेंटरकडे रवाना झाले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आहेत. ही बैठक नेमकी कशासाठी आहे, हे समजू शकले नाही.








