गॅसवाहिनी पंक्चर, अग्निशामक दलाचे मदतकार्य
फोंडा : मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे प्रभूनगर-फोंडा येथे एक संरक्षक भिंतीचा कठडा कोसळून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारगाडी व दुचाकीची जबर नुकसानी झाली तसेच नॅचरल गॅसवाहिनीची नुकसानी झाली. सदर घटना गुरूवारी उशिरा घडली. फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार प्रभूनगर कुर्टी येथे दामोदर अर्पाटमेंटची सुमारे साडेतीन मिटर उंच संरक्षक भिंत गुरूवारी उशिरा रात्री 11 वा. सुमारास कोसळल्याने मातीचा डिगाऱ्याखाली कारगाडी व दुचाकी वाहने अडकली. सुदैवाने यावेळी रस्त्यावरून कुणी ये-जा करीत नव्हते त्dयामुळे मोठा अनर्थ टळला. फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पंक्चर झालेली गॅसवाहिनी कर्मचाऱ्यातर्फे बंद करण्यात आली. डिगाऱ्याखाली सापडलेली दोन्ही वाहने हटविण्यात आली. स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या टिमने महत्चाचे मदतकार्य केले.









