ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कोंढवा बुद्रुक परिसरातील येवलेवाडीत कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडीतील कापडाच्या गोदामाला आज सकाळी आठच्या सुमारास आग लागली. गोदामात कापड आणि पडदे असल्याने क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केले. स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल असून, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
#WATCH | Fire breaks out in a godown in Yewalewadi area of Pune, Maharashtra. Fire tenders at the spot. More details awaited. pic.twitter.com/4CBiPJ49l1
— ANI (@ANI) July 14, 2023
गोदामात कापड साठा मोठय़ा प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरत आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.








