अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिलेल्या पाठींब्यानंतर आता मंत्रिंडळाच्या विस्तारासाठी हलचाली वेगाने सुरू झाल्या असतानाच अजित पवार यांना अर्थमंत्रालयाची जबाबदारी मिळाल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालयाबरोबरच सहकार खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी काळात अर्थमंत्रालय सांभाळणाऱ्या अजित पवार हे पुन्हा त्याच खात्यासाठी आग्रही होते. महाविकास आघाडी काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधीवाटपात भेदभाव करतात. राष्ट्रवादीच्या आमदारांना ज्यादा निधी देऊन शिवसेना आमदारांना दुजाभाव देत असल्याची टिका करून शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठींबा काढून घेऊन सरकार पाडले होते.
पण आता बदलत्या राजकिय समिकरणानंतर अजित पवारांनी शिंदे गटाला पाठींबा देऊन अर्थमंत्रालयावर दावा केला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची गोची झाली असून खाते वाडपाचा तिढा अधिक वाढणार कि अलगद सुटणार हे पहावे लागणार आहे.