Khed Crime News : पतीचे अनेक मुली व महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माणगाव (Mangaon) सत्र न्यायालयाने पत्नी पूजा अजित वर्मा हिला 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.ही घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर (Poladpur) तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे 5 मे 2015 मध्ये घडली होती.
पतीचे अनेक मुली व महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी सतत भांडण करत असे.कडाक्याचे भांडण झाल्यानंतर पतीने पत्नीला शांत करण्याच्या हेतूने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले.रागाने संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्याच अंगावर माचिसची काडी टाकत पतीला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पती अजित परमेश्वर वर्मा हा गंभीररित्या भाजला होता. या प्रकरणी पोलादपूर पोलीस स्थानकात अजित वर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पत्नी पूजा हिला अटक करण्यात आली होती.माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.या खटल्याची सुनावणी झाली असता वैद्यकीय अधिकारी व निवासी तहसीलदारांची साक्ष महत्वाची ठरली.सरकार पक्षातर्फे ॲड. जितेंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले.









