वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली दखल
बेळगाव : खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील झाडाच्या फांद्या कोसळून चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. ते झाड धोकादायक होते. त्यामुळे हटवावे, अशी मागणी होत होती. याबाबत वनविभागाला माहिती दिली होती. त्यांनी बुधवारी ते झाड हटविले. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. खडेबाजार पोलीस स्थानकानजीकच्या शाळेतील विद्यार्थीही ये-जा करत असतात. याचबरोबर दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. जोरदार वारा व पावसामुळे झाडाच्या फांद्या अनेकवेळा कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. हे झाड धोकादायक असल्यामुळे हटविणे गरजेचे होते.









