कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलाच्या खुनाचा कट रचणाऱ्या चाैघांना तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हाॅटेलवर जेवणाची ऑर्डर देण्याच्या कारणावरून झालेला वाद मनात धरून खूनाचा कट रचण्यात आला होता, या प्रकरणी वहागाव येथील तिघांना तर येणके गावातील एकाला अटक करण्यात आली असून संशयितांकडून दुचाकी, कुऱ्हाड, चाकू व कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे.
प्रितम चंद्रकांत पाटील वय ३१ रा. वहागांव ता. कराड,वहागाव येथील सागर अशोक पवार वय ३१ व किरण मोहन पवार वय ३१ रा. वहागांव ता. कराड, ऋषीकेश अशोक पाटील वय २२ रा. येणके ता. कराड यांच्या विरुध्द तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी आयुष सुहास बोराटे रा. शिरवडे याचा खुन करण्याचा कट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. ओवासे हे करीत आहेत.









