निरीक्षक मोहन गावडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
फेंड़ा : म्हार्दोळ पोलीस स्थानकातर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी जागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. मंगेशी येथील वागळे हायस्कूलच्या विद्यार्थ्याना म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी मार्गदर्शन केले. वागळे हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना निरीक्षक गावडे म्हणाले की अमलीपदार्थाच्या सेवनामुळे मानसिक आरोग्य बिघडते. अमलीपदार्थाचे सेवन हे आरोग्यासाठी अंत्यत घातक आहे. अमलीपदार्थाचे सेवन करणाऱ्याविरोधात आवाज उठविणे देशाचा सुज्ञ नागरिक म्हणून कर्तव्य आहे. याकामी ड्रग्सचा नायनाट करण्यासाठी सर्वानी एकजुटीने लढा देऊया असा संकल्प निरीक्षक गावडे यांनी केला. यावेळी त्याच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक सांगोडकर व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.









