वृत्तसंस्था/ मुंबई
24 जुलैपासून खेळविल्या जाणाऱ्या देवदर करंडक एक दिवशीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचा तसेच भारताचा अष्टपैलू शिवम दुबेचा पश्चिम विभाग संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या संघात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
यापूर्वी म्हणजे शेवटची देवदर करंडक क्रिकेट स्पर्धा 2019-20 साली भरविली गेली होती. त्यानंतर सलग दोन हंगामामध्ये कोरोना समस्या निर्माण झाल्याने ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. 2023 ची देवदर करंडक क्रिकेट स्पर्धा पाँडेचेरी येथे 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 जणांचा पश्चिम विभाग संघ निवडण्यात आला आहे. 2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शिवम दुबेने 16 सामन्यातून 418 धावा जमविल्या होत्या. पश्चिम विभाग संघामध्ये दिल्लीच्या पृथ्वी शॉचा समावेश असून प्रियांक पांचाळकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सर्फराज खान आणि राहूल त्रिपाठीलाही या संघात संधी देण्यात आली आहे.
पश्चिम विभाग संघ : प्रियांक पांचाळ (कर्णधार), पृथ्वी शॉ, राहूल त्रिपाठी, हार्विक देसाई, हेट पटेल, सर्फराज खान, अंकित बावणे, समर्थ व्यास, शिवम दुबे, अतित शेठ, पार्थ भूत, मुलानी, नागवासवाला, चिंतन गजा, राजवर्धन हंगिरगेकर. राखीव खेळाडू : चेतन साकारिया, तुषार देशपांडे, युवराज दोडीया, अबू काझी आणि के. पटेल.









