रिलायन्सचे समभाग सर्वाधिक वधारले, सेन्सेक्समध्ये 63 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीचा दबाव सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअरबाजारात पाहायला मिळाला. सेन्सेक्स, निफ्टी दिवसअखेर काहीशा तेजीसोबत बंद झाले. यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग सर्वाधिक वधारलेले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 63 अंकांच्या वाढीसह 65,344 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 24 अंकांच्या वाढीसह 19355 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग घसरणीसोबत बंद झाले तर उर्वरीत 10 समभाग तेजीसोबत बंद झाले होते. सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 3 पैसे मजबूत होऊन 82.58 वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सर्वाधिक 3.98 टक्के तेजीत होते तर टाटा स्टील व जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभागही वाढीसह बंद झाले. बरेचसे क्षेत्रांचे निर्देशांक मात्र सोमवारी नकारात्मक बंद झाले होते. धातू निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत होते. धातू निर्देशांक 1.8 टक्के तेजीत होता तर मिडकॅप निर्देशांक 0.45 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्के इतका घसरणीत होता.
सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग तर तेजीत होतेच शिवाय भारतीएअरटेल, सन फार्मा, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स व अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वाढीसह बंद झाले. घसरणीचा विचार केल्यास एचसीएल टेक यांचे समभाग सर्वाधिक 2.94 टक्के घसरले. यासोबत टायटन 2.91 टक्के, पॉवरग्रिड कॉर्प 2.11 टक्के, विप्रो 1.53 टक्के, टीसीएस 1.52 टक्के, एचयुएल 1.46 टक्केयांचे समभाग 0.96 टक्के नुकसानीसह बंद झाले. आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांचे तिमाहीत अहवाल जाहीर होणार असून याचा दबाव अर्थात आयटी निर्देशांकातील कंपन्यांच्या समभागांवर दिसला.









