वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवार सकाळ ते रविवार सकाळ या चोवीस तासांच्या काळामध्ये देशभरात कोरोनाच्या नव्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 1,454 इतकी आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांमध्ये देशभरात 5 लाख 31 हजार 913 लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना उद्रेकाच्या आतापर्यंतच्या एकंदर काळात देशातील 4 कोटी 49 लाख 94 हजार 575 नागरीकांना या रोगाची लागण झाली. त्यांच्यापैकी 4 कोटी 44 लाख 61 हजार 208 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के इतके आहे. मृत्यूचे प्रमाण लागण झालेल्या रुग्णांच्या तुलनेत 1.18 टक्के आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण अभियान चालविले आहे. आत्तापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत कोरोनाविरोधी लसीच्या 220.66 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. 100 कोटींहून अधिक लोकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.









