कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहरावासियांचा जिव्हाळाचा विषय असलेल्या काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले असून दोन महिन्यात कामे पूर्ण होतील, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेतील कामाचा रविवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सतेज पाटील म्हणाले. पाईपलाईन काम अंतिम टप्प्यावर आहे. धरण क्षेत्रातील पाणी जॅकवेलमध्ये आल्याने योजनेतील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. जॅकवेल पूर्ण झाले असून पंपींग हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काळम्मावाड धरण ते पुईखडी अशी 53 किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे. यापैकी 23 किलोमीटरचे पाईपलाईनचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. 30 किलोमीटरचे टेस्टींग बाकी असून महिनाभरात पूर्ण होईल. बिद्री ते जॅकवेल अशी 27 किलोमीटर विद्युतलाईन टाकायची असून यापैकी केवळ 4 किलोमीटर भूमीगत विद्युतलाईनचे काम शिल्लक होते. तेही काम सुरू झाले असून 15 दिवसांत लाईन टाकून होणार आहे. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, मनपा काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता सुनिल पाटील, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, राजु लाटकर, संदीप नेजदार, मोहन सालपे, संदीप कवाळे, श्रावण फडतारे, मधुकर रामाणे, राजेंद्र साबळे, गोकुळ संचालक राजू मोरे, सागर यवलुजे, अश्पाक आजरेकर, संजय लाड, दिग्विजय मगदूम, जल अभियंता अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र माळी, युनिट कन्सल्टंटचे विजय मोहिते, काळम्मावाडी सरपंच संदीप डवर, माजी सरपंच जे.के.पाटील, चंद्रकांत चौगले, वैभव तहसीलदार, बाजीराव चौगले, दगडू चौगले, आदी उपस्थित होते.
दोन उपसा पंप जोडण्याचे काम सुरू
सर्वात कठीण असणारे धरण क्षेत्रतील दोन्ही जॅकवेल पूर्ण झाली आहेत. निम्म्याहून अधिक जॅकवेल धरणातील पाण्याने भरले आहे. त्यामुळे जॅकवेल क्रमांक एक मधील दोन पंप बसविण्याचे काम सुरू केले आहे. 940 एच.पी क्षमतेचे दोन पंप असून महिना अखेरीस हे दोन्ही पंप जोडून कार्यन्वीत होतील.
काळम्मावाडी धरणातील काम अत्यंत कठीण, धोकादायक होते. सर्वांच्या सहकार्याने संकटावर मात करत आता काळम्मावाडी धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आले असून योजनेतील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आपल्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असून या योजनेच्या माध्यमातून पुण्याचे काम करण्याचे भाग्य मिळाले आहे.
आमदार सतेज पाटील









