मालवण : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांच्या काळामध्ये मुलांचे अभ्यासाच्या पुस्तकाचे तसेच अवांतर वाचन खूपच कमी झाले आहे असे दिसून येते. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध प्रकारच्या योजना राबविणे आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनात वाचनाला फार महत्व आहे. आपल्या आवडीनुसार मुलांनी वाचन करावे त्यातूनच वाचनाचे महत्व समजून त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी या हेतूने शासनाच्या सूचनेनुसार कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालय येथे बाल कुमार ज्ञान कोपरा ( Children Knowledge Corner) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील व पंचक्रोशीतील मुलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.