प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने शनिवारी गणेशपूर परिसरात हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमा संकलित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी यापुढे भग्न प्रतिमा टाकू नये, त्या फाऊंडेशनकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी केले आहे.
गणेशपूर येथील राजश्री तुडयेकर यांनी फाऊंडेशनशी संपर्क साधून भग्न प्रतिमा संकलित करण्याची विनंती केली. त्यानुसार शनिवारी त्यांच्या घरातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या प्रतिमा व परिसरातील भग्न प्रतिमा संकलित करण्यात आल्या. लवकरच त्या सर्व प्रतिमांचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, असे अध्यक्षांनी सांगितले.









