केळ्याच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात अनेक स्थानी गुरुवारी केळ्याच्या झाडाला पाण्यासह चणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. केळ्याच्या झाडावर उगविणारे केळफूल हे सामान्यपणे भूमीच्या दिशेने झुकलेले असते. याच केळफुलाचे रुपांतर पुढे केळ्याच्या घडात होते. त्यामुळे केळफुलाचे संवर्धन केले जाते.
बिहारमधील मुझ्झफ्फरपूर येथे एक केळफूल अशा प्रकारे उगवले आहे, की ते त्याच्या पाकळ्या कमलपुष्पाप्रमाणे आकाशाकडे वाढत आहेत. अशा केळ्याच्या झाडांना विष्णू केळे असे संबोधण्याचा प्रघात आहे. ज्या झाडांना अशा प्रकारचे केळफूल लागते, त्यांचे आध्यात्मिक महत्व मोठ्या प्रमाणात मानले जाते. अशा ऊर्ध्वगामी केळफुलांपासून निर्माण होणारी केळी आकाराने लहान पण चविष्ट असतात. पण ती खाल्ली जात नाहीत. केवळ त्यामुळे ती भगवान विष्णूंच्या नैवेद्यासाठी किंवा आरास करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो.
हे केळ्याचे झाड रामकिशोर नामक शेतकऱ्याने लावले असून त्याचे रोप केरळमधून आणल्याचे ते स्पष्ट करतात. सध्या केळ्याच्या झाडावर फुललेले हे कमळ पाहण्यासाठी त्यांच्या शेतात अनेक लोक येत आहेत. लावल्यापासून एक वर्षाने हे दुर्मिळ केळफूल त्यांच्या झाडावर उगवले आहे.









