फटाक्यांची जोरदार आतषबाजी-व्यापाऱ्यांकडून मिठाई वाटप
वार्ताहर/ अगसगे
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाचक असलेला एपीएमसी दुरुस्ती कायदा मागे घेतल्याने एपीएमसी येथील भाजीमार्केट व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जल्लोष केला. आनंद व्यक्त करताना फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. मिठाई वाटून हर्षोत्सव करण्यात आला.
मागील यापूर्वीच्या राज्य सरकारने एपीएमसी कायद्यात दुरुस्ती केली होती. आणि खुल्या बाजारपेठेला परवानगी दिली होती. यामुळे राज्यात खासगी कंपन्या कृषी बाजारात उतरल्या होत्या. यामुळे एपीएमसी सरकारी बाजारपेठेवर याचा मोठा आर्थिक परिणाम झाला होता. तसेच खासगी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. मालाला योग्य भाव मिळत नसे. शेतकऱ्यांना फसवण्यात येत होते. यामुळे राज्य सरकारला आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत होते.
खासगी मुक्त बाजारपेठ कायदा रद्द
राज्यात यापूर्वी 2018-19 मध्ये राज्यातील एकूण 167 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न 570 कोटी ते 600 कोटी होते. त्यानंतर 2022 ते 2023 मध्ये एपीएमसी कायदा दुरुस्तीनंतर हे उत्पन्न 193 कोटी रुपयांवर घसरले होते. या एपीएमसी कायद्याची मुख्यमंत्र्यांनी दुरुस्ती केली आहे. यामुळे खासगी मुक्त बाजारपेठ रद्द केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि सरकारलाही उपयोगी ठरणार आहे. या कायद्यात दुरुस्ती केल्याने शनिवारी एपीएमसी भाजीमार्केटच्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एपीएमसीच्या प्रवेशद्वाराजवळ आनंद साजरा केला व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
खासगी जय किसान भाजीमार्केट झाल्याने एपीएमसीतील भाजीमार्केटवर याचा परिणाम झाला आहे. एपीएमसी दुरुस्ती कायदा राज्य सरकारने मागे घेतल्याने आता बेळगाव एपीएमसीला चांगले दिवस येतील म्हणून शेतकरीवर्गाने व व्यापारी वर्गाने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.









