न्हावेली / वार्ताहर
तळवणे येथील श्री म.परशुराम भारती महाराज मठात रविवार दि.९ जुलै २०२३ रोजी श्री.स्वामी राजेंद्र भारती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत स.१०;०० ते सायं.५:०० वाजे पर्यंत गुरुपौर्णिमा उत्सव- २०२३ संपन्न होणार आहे. माऊली संगीत विद्यालय व गुरुकृपा संगीत विद्यालय , तळवणे प्रशिक्षक श्री भावेश राणे, संतोष (बाबु) गोडकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १०;०० वाजता कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ने शुभारंभ,त्यानंतर मान्यवरांचे स्वागत,कार्यक्रम स्थळी गुरूंचे मार्गदर्शन,मनोगत, तसेच विद्यार्थ्यांचे गायन, वादन, पकवाज ,तबला,सोलो, गुरुपुजन,दिग्गज कलाकारांचे गायन आदी कार्यक्रम होणार आहेत.अधिक माहितीसाठी तरी सर्व रसिक प्रेक्षक,ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी अजित पोळजी_ ९७६४९२२६२७ या नंबर संपर्क साधावा.









