ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ऐतिहासिक गावांमधील महापुरुषांशी संबंधित 13 शाळांचा कायापालट होणार आहे. त्यासाठी 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले शाळा, साताऱ्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले शाळा, कोल्हापूर येथील राजषी शाहू महाराज शाळा, नाशिकमधील कुसुमाग्रजांची शाळा, अहमदनगरच्या चैंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा, अमरावतीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबागाडगेबाबा शाळा, अमरावती येथील शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख या शाळांचा कायापालट होणार आहे.
सांगलीतील लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतिसिंह नाना पाटील या शाळांचाही चेहरामोहरा देखील बदलणार आहे. रत्नागिरीतील महर्षी धोंडो केशव कर्वे व साने गुरुजी शाळेलाही निधी मंजूर करण्यात आला आहे.