बेळगाव : यावर्षी पावसाने ओढ दिल्याने आधीच आर्थिक विवंचनेत असताना चरायला सोडलेली दुभती म्हैस अचानक दगवल्याने वडगाव पाटील गuलीतील शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नकांत चव्हाण हे शनिवारी दुपारी धामणे रोड येथील तलावा शेजारी जणावरे चरायला घेऊन गेले होते. यावेळी अचानक एक म्हैस मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे चव्हाण यांचे अंदाजे 80 हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेतकर्याला मनपा प्रशासन, एपीएमसी किंवा पशुसंगोपन खात्याकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.









