हजारोंच्या संख्येत आहेत तिचे फॉलोअर्स
जगात लोकांना अत्यंत अजब गोष्टी करताना तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. सोशल मीडियाच्या जमान्यात लोक आता अत्यंत विचित्र गोष्टी करत आहेत. स्वत:च्या झोपेपासून दिवसभरातील प्रत्येक कृती ते सोशल मीडियावर शेअर करतात, जेणेकरून ह्यूज आणि फॉलोअर्स मिळू शकतील. परंतु एका ऑस्ट्रेलियन युवतीने जो ट्रेंड सुरू केला आहे, तो सर्वांना शक्य नाही.
ही युवती टिकटॉकवर स्वत:चे व्हिडिओ अपलोड करते, तिने एक अजब सीरिज तयार केली आहे. ऑस्ट्रेलियात राहणारी इन्फ्लुएंसर ‘सेज डॉट कॉम डॉट एयू’ या नावाने व्हिडिओ पोस्ट करते. ही युवती सिडनीच्या आसपासच्या भागात निर्माण करण्यात आलेल्या पब्लिक टॉयलेट्सचा रिह्यू रितसर तेथे जाऊन अनुभवासोबत करते.
ही युवती मॉल्स, हॉस्पिटल्स आणि इतर ठिकाणी जाऊन तेथील टॉयलेटच्या एंबियन्सनुसार त्यांना रिव्ह्यू देते. मारिकविहले मेट्रो मॉलमधील टॉयलेट सर्वात उत्तम होता असे ती सांगते. टॉयलेट सीट, तेथील स्थिती, साबण, टॉयलेट पेपरच्या हिशेबाने रेटिंग देण्याचे काम ती करते. ही युवती स्वत:ला टॉयलेट इन्फ्लुएंसर म्हणवून घेते आणि कुठल्याही ठिकाणी कोणती गोष्ट चांगली का वाईट होती हे सांगते. तसेच यात सुधारणा करण्यासाठी ती सूचना देखील करते.
या युवतीची 20 हजार फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स तिच्या या टॉयलेटसंबंधीच्या सीरिजला पसंती देतात. तिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, तिच्या टॉयलेट टेस्टिंक कौशल्याला लोक पसंती दर्शवित असतात.