शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये मुंबई मध्ये विद्यापीठातून घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बी एम एस च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयाची दिव्या प्रदीप काकतकर प्रथम आली . महाविद्यालयाचा एकूण निकाल ९१ टक्के लागला असून प्रथम क्रमांक दिव्या प्रदीप काकतकर (५१७ गुण ), द्वितीय क्रमांक करिना महादेव शेट्ये (४९३ गुण) तर तृतीय क्रमांक देवू बाळकृष्ण गवस ४६६ गुण यांनी प्राप्त केला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर , संचालक पंढरी परब , एक्सझीक्युटिव्ह प्रवीण प्रभू – केळुसकर व डॉ . महेश सातवसे , प्राचार्य यशोधन गवस यांनी अभिनंदन केले आहे . यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य यशोधन गवस , प्रा . एल . पी पाटील, प्रा . आनंद नाईक , प्रा . साईप्रसाद पंडित , प्रा . अस्मिता गवस , प्रा. मेधा मयेकर यांनी मार्गदर्शन केले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









