पुणे / प्रतिनिधी :
कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसाचा जोर येत्या दोन दिवसांत कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्राकडून मोठय़ा प्रमाणात बाष्प येत आहे. दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर किनारपट्टीदरम्यान ट्रफ कार्यरत आहे. उत्तरपूर्व अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीलगत हवेची द्रोणीय स्थिती आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्यात जोरदार पाऊस होत आहे, त्यातही गेले दोन दिवस कोकणाच्या काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस राहणार आहे. पुढील दोन दिवस काही जिल्हय़ात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल.
शुक्रवार : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतीमुसळधार
पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा यलो अलर्ट – विदर्भातील बहुतांश जिल्हे, मुंबई, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,
शनिवार : ऑरेंज अलर्ट- पालघर, रायगड, पुणे, यलो अलर्ट – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, मुंबई
रविवार : यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे








