कुडाळ : प्रतिनिधी
मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी!
कुडाळ येथील इंग्रजी माध्यम शाळेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका स्वामिनी योगेश गावडे-वारंग (36, रा. माणगाव ) यांचे सर्पदंशाने बांबोळी -गोवा येथे उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी निधन झाले.
18 जून रोजी माणगाव येथील घराच्या परिसरात त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सावंतवाडी व तेथून बांबोळी -गोवा येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्या कोमात गेल्या होत्या. गेले अठरा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. आज त्यांचे निधन झाले









