Sharad Pawar : कुणी काही नियुक्त्या केल्या त्यात तथ्य नाही नसून मीच अजून पक्षाचा अध्यक्ष असल्याचे ठाम मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार य़ांनी म्हटले आहे. ते आज दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या राष्ट्रिय कार्यकारणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. तसेच घडलेल्या सर्व गोष्टींची किंमत चुकवावी लागेल असा ईशारा शरद पवारांनी बंडखोर आमदारांना दिला.
पक्षातील राजकिय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रिय कार्यकारणीची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीने आपला पाठींबा शरद पवांरांना जाहीर केला. आमचा शरद पवारांच्या नेर्तृत्वावर विश्वास असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “पक्षामध्ये कुणी काय नेमणूका केल्या याला महत्व नाही. सध्या मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रप्फुल्ल पटेल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पहाता आमचा निवडणुक आयोगाकडे जाण्याचा मानस असल्याचेही आहे. आमचा निवडणूक आयोगवर पुर्ण विश्वास असून आम्हाला योग्य न्याय मिळेल.” असेही ते म्हणाल.
पुढे बोलताना ते म्हणाले, “सध्या संख्याबळाचा दावा केला जात आहे. कुणाकडे किती संख्याबळ हे वेळ आल्यावर करेल. पण ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टीची योग्य किंमत बंडखोरांना चुकवावी लागेल.” असाही त्यांनी विश्वास दाखवला.








