अतिमुसळधार पावसामुळे कारवार जिल्हा किनारपट्टीवरील तालुक्यामधल्या शाळांना आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी किनारपट्टीवरील जनजीवन ठप्प झाले आहे. किनारपट्टी जलमय झाले असून ठिकठिकाणी लहानमोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. कारवार तालुक्यातील देवलमक्की येथे चोवीस तासात 23 C.M. पावसाची नोंद झाली आहे.