बेळगाव : रिसालदार गल्ली येथे गटारीतील कचरा काढून तो बाजूला फेकला आहे. त्या कचऱ्याची उचल वेळेत करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पुन्हा तो कचरा गटारीतच जाण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने त्या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांतून होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणच्या गटारी साफ करण्यात येत आहेत. मात्र गटारीतील काढलेला कचरा वेळेत उचलणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा तो कचरा पुन्हा गटारीत जाऊन पाणी निचरा होणे अवघड जाणार आहे. गटारीतील कचरा बाजूला ठेवला असल्यामुळे या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. तेव्हा तातडीने त्या कचऱ्याची उचल करावी
कचरा त्वरित उचल करा
शहरामधील अनेक ठिकाणी गटारीतील कचरा बाहेर काढला गेला आहे. तो कचरा वेळेत उचलला तर त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा पुन्हा गटारी साफ कराव्या लागणार आहेत. तेव्हा कोणत्याही ठिकाणी साचलेला कचरा काढल्यानंतर त्या कचऱ्याची तातडीने उचल करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.









