नवी दिल्ली :
स्मार्टफोन निर्माता मोटोरोलाने सोमवारी 3 जुलै रोजी भारतात ‘मोटोरोला रेझर 40’ आणि ‘मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा’ हे दोन मॉडेल सादर केले आहेत. यावेळी कंपनीने दावा केला आहे की रेझर 40 अल्ट्रा हा जगातील सर्वात कमी जाडीचा फ्लिप फोन आहे. हा जगातील सर्वात मोठा बाह्य डिस्प्ले फोन देखील राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स अॅमेझॉनवरुन दोन्ही स्मार्टफोन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
स्मार्टफोनचा तपशील
डिस्प्ले: कंपनीने दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 144 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा एफएचडी ओएलइडी अंतर्गत डिस्प्ले राहणार आहे. दोन्ही फोनचे बाह्य डिस्प्ले वेगळे आहेत. रेझर40 मध्ये 1.5-इंचाचा ओएलइडी डिस्प्ले राहणार आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर: कामगिरीसाठी, रेझर40 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 झेन 1 प्रोसेसर आहे. बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी, फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4200 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
कनेक्टिव्हिटी पर्याय: कनेक्टिव्हिटीसाठी, दोन्ही फोन चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी सह 5जी, 4जी, 3जी, 2जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. सिंगल व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. यापेक्षा कमी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ही 59,999 रुपये राहणार आहे.









