Praful Patel News : शिवसेनेची आयडॉलॉजी जर आपण स्विकारू शकतो. त्यांनी मिठ्ठी मारू शकतो. तर भाजपकडे तसं पाहायला काय हरकत आहे. आम्ही पक्ष विकून तेथे गेलो नाही. आम्ही स्वाभिमानाने राष्ट्रवादी पक्ष म्हणून या युतीत भागीदार झालो आहोत.काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती,फारूक अब्दुल्ला हे भाजपात जाऊन एऩडीएमध्ये जाऊ शकतात.तर मग आम्ही का नाही. आम्ही सत्तेच्या हव्यासापोटी हा निर्णय घेतला नाही, तर देश आणि आमच्या पक्षासाठी घेतल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. आज ते मुंबईतील एमईटी वांद्रे येथे बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी अजितदादांसोबत का आहे ते आज सांगणार नाही. योग्य वेळ आल्यावर सांगणार.माझा अजितदादांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना काही लोक कटकारस्थान रचून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये भाजपसोबत जाऊ अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती. बहुतांश आमदारांना तेव्हा भाजपसोबत जायचं होतं. हे काय एका दिवसात झालं नाही. अजूनही वेळ गेली नाही. आमची भावना समजून घ्या. तुमच्या वरदहस्ताखाली आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. तुम्ही आमचे दैवत आहात आम्हाला आशीर्वाद द्या. आपण सगळेजण मोठ्या संख्येने सोबत राहुया, तुमच्या आशीर्वादाने आम्हाला काम करायचं आहे. असं जाहीर आवाहन यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वैचारिक म्हणजे काय. ज्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. शरद पवार यांच्यावर सर्वात जास्त टिका सेनेने आणि बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. वैचारिक म्हणजे आयडॉलॉजी. शिवसेनेची आयडॉलॉजी जर आपण स्विकारू शकतो.मग भाजपची का नाही असा, सवालही त्यांनी केला.
प्रफुल्ल पटेल सौम्य व्यक्ती आहे,कमी बोलतो अस तुम्हाला वाटतं असेल, पण कमी बोललेचं बरं. कारण एक दिवस माझ्यावरही पुस्तक लिहायची वेळ येणार आहे. ज्यावेळी प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहिल त्यावेळी देशाला आणि महाराष्ट्राला काय काय समजेल हे मी आज सांगणार नाही.देशानं पाहिलयं, जेथे शरद पवार तेथे पटेल.आज आम्ही अजितदादांना पाठिंबा देत आहोत त्याचा इशारा तुम्हाला समजावा हे मला कार्यकर्त्यांना सांगायचे आहे.
मी शरद पवार यांच्यासोबत पाटण्यातील संयुक्त विरोधी पक्षाच्या बैठकीला गेलो होतो आणि तिथले दृश्य पाहून मला हसू आले.तिथे 17 विरोधी पक्ष होते. पण त्यापैकी 7 विरोधीपक्षात खासदार 1 होता तर काही पक्षात खासदार शून्य आहेत. या पक्षांच्या सहकार्याने आम्ही कसा बदल घडवून आणणार, असंही ते म्हणाले.








